IMG_2204

Sandhan – Ek Manogat

Hello everyone,

Seriously, I don’t know why I m writing this… But I really wanted to write about MY dream trek.

Disclaimer – Please note that the initial part of my write-up is generic. I do not intend to point at anyone. Any resemblance is purely coincidental.

It is about just what I feel about some people after my observation on my 11th trek. For some people it will be harsh like Sandhan Stones. at a point you may think this is taunt for you, please trust me it’s not, it’s just what I feel. It’s my personal opinion.

This is my 11th trek, still I don’t feel like I am a trekker. May be because I do not think that I am fit enough, the way I should be. Or maybe my behavior is not matured enough which I should have been after these 11 treks.

Sandhan My dream Trek: 

मी सांधण बद्दल माझ्या पहिल्याच trek ला ऐकलं होतं, How beautiful and Hard it is. Why people who have done sandhan feel like they have achieved something in their life.
माझ्या १० trek मध्ये असा एकही दिवस न्हवता जेव्हा मी सांधण बद्दल कुणा सोबत बोललो नसेन, as I was gathering my people who will do sandhan with me. That was funny coz only few of them could make it with me but still it was awesome !!

तर गोष्ट अशी कि मी ऐकलं कि trekking हि मदिरे सारखी आहे, जी पूर्ण शरीरात भिनते आणि मग आपल्यातलं आपलेपण बाहेर येतं. आपण स्वतःचे अस्तित्व विसरतो, आम्ही trekking ला जातो तेव्हा कुणी senior HR asto, कुणी project manager, कुणी CA, कुणी advocate कुणी काय तर कुणी काय…. अहो हेच काय कधी कधी तर हिमालया आणि लिंगाणा सारखे कठीण treks केलेले पण भटके भेटतात.

पण trek मध्ये किंबहुना त्या त्या trek च्या प्रवासाची सुरवात करण्या आधीच्या स्वतःच्या व्याक्तीमत्वाबाद्द्ल, कार्तबगारीबद्दल विसरून कोणत्याही विषयाला सुरवात करतात. खरंच.. किती मोठ्या मनाचे असतात न trekkers.
अहो एकवेळच्या जेवणाचं सोडा, रस्त्यात “खाऊ द्या ना “ म्हणत फिरणाऱ्या लहान मुलांच्या आई वडिलांनी बनवलेलं जेवण हाताची बोटं चाटून खाणारी आणि त्याच लहान मुलांना स्वतःची भूक भागवायला आणलेली biscuits, खाकरा सहज विचार न करता देणारी जमात, म्हणजे trekker

“मी इतक्या लवकर लोकांना ओळखत नाही” असे लोक माझ्या बद्दल बोलतात, पण तरी मी असे कित्तेक लोक बघितले आहेत जे स्वतःची manager ची post trek मध्ये पण continue करतात, seriously अश्या लोकांना कुणीतरी सांगायला हवे कि इकडे कुणी तुमची खोटी स्तुती करून तुमच्या kade promotion ची demand करणार नाही आहे.. कुणी तुमच्या कडून salary increment ची अपेक्षा सुद्धा ठेवत नाही आहे. कृपा करून तुम्ही तुमचा मी पणा trek वर नका आणू अगदी तुम्ही CEO असलात तरी कारण तुम्ही जो पर्यंत हा ego स्वत: सोबत ठेवाल तो पर्यंत माझ्या साहिद्रीच्या डोंगरांचा अभिमान, त्यांचा स्वाभिमान, त्या किल्याचा डोलेदारपणा, त्यांचा दिलखुलास पणा, ताठ मानेने उभ्या असलेल्या माची, त्यांचे ते बेधकड कडे, ते सुंदर दरवाजे, त्या रागीट तोफा, ते आज्ञा पालन करणारे बुरुज, माझ्या सह्याद्रीच्या किल्यांच्या चेहऱ्या वरचा राग त्याचा त्रास त्याची अपेक्षा नाही बघू शकणार तुम्ही.

इथून निघताना तुम्ही भले हि मी trek केला असे समाधान घेऊन जात असाल, पण “हा trekker पण मला समजू शकला नाही” अशी खंत माझ्या सह्याद्रीच्या किल्ल्याला देऊन जाताय, ह्याचं भान असुद्या

आज काल बरेच जण “ये जवानी है दिवानी” चित्रपट २ – ३ वेळा पाहून trekker बनतात तर काही ३ Idiots movie मधल्या फरहान चा स्वप्न जगत पुढे जात आहेत.
नाही तशी काही हरकत नाही, कदाचित मी पण त्यातलाच एक असू शकतो, पण खरंच जे काय करताय ते कुणाला दाखवायचं म्हणून करण्यापेक्षा खरंच तुमच्या मनाला कुठे तरी समाधान वाटत असेल तरच करा. नाहीतर आपल्या हौशी चा trek मधल्या कुणालातरी कळत – नकळत त्रास होतोय हे उघड्या डोळ्यांनी बघा आणि इथून पुढे काळजी घ्या.
आठवडाभर building च्या जंगल मधून, traffic च्या range मधून निघून कधी pollution, कधी smoking, कधी perfume, तर कधी भयानक घामाचा वास घेऊन, आपण १ दिवस, जास्तीत जास्त ३६ तासासाठी बाहेर निघतो, जिकडे तुही खरंच लहानपणी ऐकलेले झाडांचे जंगल बघायला मिळतं.

आपली घरी जायची घाई बसगाडी बघण्याच्या सुखापेक्षा, एका झाडाची सावली, पाण्याच्या bottle मध्ये तुमच्या साठी ठेवलेले ते शेवटचे २ घोट, ते गडावर चढून तुम्हाला लिंबूपाणी पाजणाऱ्या काकूंच्या चेहऱ्यावरचे समाधान, कधी मोगरा, कधी जाई जुई तर कधी माहित नसलेल्या फुलांचा सुगंध घेताय, freshly prepared oxygen घेताय. त्या गोष्टींची किंमत करायला त्या trek ची किंमत करा. आणि सगळ्यात चवदार ती म्हणजे trek मधली भाकरी.

खरंच प्रवचन न्हवते द्यायचे पण माझा हा सगळ्यात मस्त trek होता, त्या आधी जे वाईट मनात भरलाय ना इतक्या treks मध्ये ते सगळं सांगायचं होतं, ते सांगावेसे वाटले म्हणून बोललो कुणाला वाईट वाटले तर मला ping करा, तुमचा गैरसमज दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल.

तर..

गोष्ट अशी कि finally office मधून ८ वाजता निघून १०.३० ची train पकडायला मी निघालो, दादर वरून आमच्या pro च्या birthday साठी easily carry करता येईल असे cake घेतले.
तिचा birthday ला न promise केलेला कि तिचा हा birthday आपल्या सह्याद्रीच्या कुशीत साजरा करू म्हणून, आणि आमचा प्रवास सुरु झाला कसारा साठी.
रस्त्यात नेहमी प्रमाणे सोबत trek करणाऱ्या बऱ्याच लोकांसोबत ओळख झाली, सकाळी मस्त चवदार नाश्ता करून आमच्या dream trekला पहाटे ५.३० च्या सुमारास सुरवात केली.

रोशन ने मस्त plan केलेला, त्याच्या plan नुसार जर आम्ही सगळे केले असते तर त्याला माहिती होते कि आमचा हा trek एक memorable असेल आणि आम्ही तो खूप enjoy करू, तसाच प्रयत्न शरद, पल्लवी आणि रोशन यांनी पूर्ण trek भर केला.

थोडा descending start करून आणि थोड्या अंतरावर आलो तिथेच सांधणचा सुंदर असा एक पाण्याचा भाग आला, जिकडून आम्ही मस्त कंबरे एवढ्या पाण्यातून स्वत:च्या आणि बाकी trek members च्या bags पास करत करत पार केला.

Wild Rangers नेहमी सांगतात कि trek मध्ये सगळे leader आहेत, प्रत्येकाने एका leader प्रमाणे वागून trek पूर्ण केला तर तो सगळ्यांसाठीच स्मरणीय ठरतो. ह्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे पहिल्यांदा एकमेकांना भेटलेले, काही fit तर काही माझ्यासारखे लोक सगळ्या group च्या bags pass करत मस्त पुढे निघाले.

कुणाचंच लक्ष न्हवतं ह्या पैकी कोणत्याही गोष्टीकडे, कारण सगळ्यांना दिसत होती ती एक सुंदर आणि मनाला भारावून टाकणारी सांधण ची दरी..

थेंबे थेंबे तळे साचे असा लहानपणा पासून नेहमी ऐकलेलं, एवढे मोठे मोठे डोंगर बनतात कसे ह्याचं कुतूहल नेहमीच मनात होतं, मोठे मोठे डोंगर बनायला मोठे मोठे दगड लागतात हे मला त्या सांधन ने सांगितलं.

प्रत्येक टप्पा पार केल्यावर मागे वळून बघताना हळूच माझ्या मनाने माझ्या पाठीवर शाबासकी दिली, म्हणाली “बघ तू हे पण करू शकतोस” . पुढे कुठ पर्यंत जायचं आहे ह्याचं काहीच थांग पत्ता न्हवता, ते सांधण च्या दगडांनी दिसूच दिलं न्हवतं.

आपण काय काय करून इथपर्यंत पोहचलो आहोत ह्याचं भान करून देणारी हि सांधण दरी. तुमच्या आयुष्यातल्या किती तरी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अश्या treks मधून मिळत असतात, तसच ह्या trek मधून पण मला बरीच उत्तरं मिळाली. अशीच उत्तरं देत देत हा सांधन trek केव्हा माझ्या मनाचा “समाधान trek” झाला माझे मलाही कळले नाही

अपर्णा गोपाल सारखे trek mates माझ्या सोबत पूर्ण वेळ होते, आम्ही कधी दगडांवर दिलेल्या खुणाप्रमाणे चालत होतो, तर कधी स्वताःच्या मनाच्या. सुरवातीला रोशन म्हणाला ते खरंच होतं कि सांदन चे दगड उडी मारायला खरंच tempt करत होती, आणि तिथेच आयुष्यातले एक गणित सुटले, tempting गोष्टींपेक्षा तुमचं ध्येय डोळ्यासमोर जाणे आणि नेहमी बरोबर रस्ता! निवडणे किती गरजेचा आहे. कारण एक उडी मारल्या नंतर सटकलेला दगड फ़क़्त तुमच्या अपेक्षा नाही तर माझ्या सोबत आलेल्या सगळ्यांचा मनोबल तोडणारा ठरू शकत होता. मी आयुष्याची समीकरण सोडवत आणि मोकळ्या मनाने जगत हा trek पूर्ण करत होतो. कुठे कुठे photo काढायचे हे पल्लवी सांगत होती आणि माझा मित्र गोपाल एकाहून एक मस्त pics काढत होता.

शेवटी ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आला, “rappelling” चा, आणि तेव्हा मला जाणीव झाली कि माझ्या सोबत माझी बहिण सुद्धा आली आहे, सांधन मध्ये समाधान शोधण्यात इतका हरवलो कि ती माझ्या सोबत आली आहे ह्याचं भानच राहिलं नाही, Thanks to प्रज्योती, सुजित, प्रियांका आणि रोशन जे माझ्या बहिणीला आणि त्यांच्या एका मैत्रिणीला इतक्या आपुलकीने, काळजीने आणि सुरक्षित पुढे घेऊन गेले.

आयुष्यात पहिल्यांदा rappelling केली आणि समजले कि सिनेमा मध्ये दाखवतात तो काही पोरखेळ न्हवे. त्यासाठी खरंच खूप तयारी करावी लागते, स्वतःची आणि स्वतःच्या मनाची. मी जमेल तशी आणि जमेल तेवढा वेळ हिम्मत दाखवून जमेल तशी rappelling केली, अर्थात ह्याचं सर्व श्रेय जातं गोरख आणि त्यांच्या team ला.

मी जमेल तशी, जमेल तेवढी हिम्मत दाखवून rappelling केलं, अर्थात पुन्हा एकदा गोरख आणि त्यांच्या team चे आभार ज्यांनी हि कठीण गोष्ट आहे ह्याची जराही जाणीव होवू न देता प्रत्येकाला खाली उतरवले. तिथून पुढेथोडं पाण्यात तर थोडं दगडांवरून मोठ्या हिम्मतीने उतरत होतो.

आता फक्त सोबत आलेल्या WILD RANGERS च्याच group चे न्हवे तर सह्याद्री, trek mates आणि अजून किती तरी नवीन नवीन लोकां सोबत करून एकमेकांना मदतीचा हाथ देत आम्ही पुढे जात होतो.

शेवटी एक शेवटचा rappelling spot आला जिकडे रोशन ने सांगितले कि इथे आपण अपेक्षेपेक्षा लवकर आलो आहोत. ह्या वेळी सगळ्यांनी खूप मस्त आणि unexpectedly खूप fast trek केला आहे. All thanks to his plans n management skills.

मध्येच त्याने एक मस्त गोष्ट सांगितली कि “now we can rest at the pond.’

ते ऐकूनच थोडं फार असलेला थकवा पण दूर झाला. कारण पाणी आणि माझे नाते खूप वेगळेच आहे, थोडं वेळ normal trek केल्यावर तो मस्त छोटा waterfall आणि pond दिसला जिथे आम्हाला बाकीचे येईपर्यंत मजा करता येणार होती आणि मग संधान पूर्ण उतरल्याचं समाधान आम्ही तिकडे enjoy करू शकणार होतो.

तिथल्या waterfall ने केलेल्या natural massage ने माझा सगळं थकवा दूर केला.

आर्चिस आम्ही तुला पूर्ण trek miss केले, बऱ्याचदा आठवण सुद्धा काढली. आणि त्या waterfall ने तर मला आपला andharban, राजमाची, हरी हर केलेले सगळे treks आठवण करून दिले.

इथेच वेळ होती जिथे मला सोबत येऊ न शकलेले भाग्या, रुपेश, नम्रता, हर्षद, रुक्मिणी, पंकज, तेजस, रुपाली, प्रवीण आणि आणखी खूप लोकांची आठवण करून दिली. तो waterfall म्हणजे पोटभर कोल्हापुरी तिखट जेवण नंतरच्या सोलकढी आणि एका गोड पण सारखा लागत होता.

तिथेच अजून आपण ह्या trek मध्ये अजून काय काय करू शकतो ह्या गोष्टी ची आठवण होत होती.

सांधन ,माझा dream trek इतक्या आरामात करू शकलो ह्याचं खरंच श्रेय Wild Rangers team ला जाते

आयुष्यातले खडतर प्रवास आपण अनुभवी लोकांच्या मार्गदर्शना खाली खरंच किती आरामात पार करू शकतो. ह्या गोष्टी ची जाणीव तिथे काही क्षणातच झाली.

तिथे थोडेफार खायला मिळाले, तो नाश्ता कोणत्या ५ star hotel मध्ये पोटभर खाऊन मिळणार नाही इतका तृप्त करणारा होता.

तिकडे आम्ही आमच्या tents कडे गेलो आणि रात्रीचं जेवण करून खूप मस्त कॅम्पिंग night enjoy केले, star gazing आणि अंताक्षरी आणि common choice असणारी ती गाणी, जणू दिवस भर झालेल्या जखमांवर मलम लाऊन देत होत्या, आणि finally १२ वाजले जिकडे आम्ही आमच्या प्रो साठी Bar bar din ye ayyee, Bar bar dil ye gayeee गाणे ओरडून ओरडून तिचा birthday celebrate करून शांत झोपलो.

ती झोप समाधानाची होती,
ती झोप स्वप्न पूर्ण झाल्याची होती.
ती झोप स्वतःच्या अपेक्षा स्वतः पूर्ण केल्याच्या आनंदाची होती.
ती झोप खरंच मी काय तरी स्वतः साठी मिळवल्याची जाणीवेची होती.
ती झोप कदाचित आज पर्यंतच्या सगळ्यात special सगळ्यात महत्वाची अशी होती
मोजून २ – ३ mins मध्ये डोळे बंद करून झोप लागली आणि सकाळी ७ ला जाग आली
खरंच सांगतो मी माझ्या स्वप्नात जवळ पास २-३ वर्षे जगलो असेन, सकाळी मी सांधन ला त्या नदीच्या काठी tent मध्ये उठलोय ह्या गोष्टींची जाणीव होण्यास मला जवळ जवळ अर्धा तास गेला.
मी कोणता मोठा नाश करून झोपलो कि काय असे वाटत होते जेव्हा मी उठलो.

नाही माहिती ती feeling काय होती, मी हि गोष्ट सुजित ला सांगितली तर त्याच्या पण same अनुभव होता. Sakali nadi kinari fresh hun chha nastha karun amhi rahilela trek suru kela पुढे थोडं चालत गेल्यावर आम्हाला सपाट जमीन दिसली. आयुष्यात कधीच सरळ रस्ता बघून डोळ्यांना एवढं समाधान न्हवते वाटले, जेवढे ती साधी पायवाट बघून मिळाले.

दगडाविना तो छोटा रस्ता खरंच normal रस्ते आपल्याला नेहमी मिळणारे सरळ रस्ते किती महत्वाचे किती आरामदायी असतात ह्याची जाणीव करून देणारे होते.

रस्त्यात दुसऱ्या group चे झालेले नवीन मित्र भेटून आम्ही trek च्या शेवटा कडे निघालो आणि बरेच छान photos खूप खूप अश्या आठवणी, खूप चांगली माणसे आणि आयुष्यात कामाला येतील असे कित्येक धडे घेऊन आम्ही शेवटी गावात पोचलो.
तिकडे पोचल्यावर खरंच भरून आले, कारण मी सांधन trek करायचं स्वप्न खूप आधी पासून बघत होतो. माझ्या सोबत असे कधीच झाले न्हवते कि मी काही विचार केला आणि ते खऱ्या आयुष्यात घडले. ते आज पहिल्यांदा घडले आणि मी अनुभवले सुद्धा.

उगाच hype करून नाही सांगत आहे पण हीच ती feeling होती तिथे पोचल्यावर, मनी असे ते स्वप्नी दिसे म्हणतात,
पण स्वप्नी असे ते प्रत्यक्षात दिसे, हे पहिल्यांदाच घडले होते माझ्या सोबत.
मी कितीही बोललो, कितीही काहीही लिहिले पण तरी माझ्या तिथल्या भावना पूर्णपणे मांडणं शक्य नाही.
ते सांधन पूर्ण केल्याचं सुख मी कधी कुणा समोर व्यक्त करूच शकणार नाही.
खरंच सांधन हा माझ्या साठी सांधन trek नाही तर तो माझ्या मनाला खूप सारे “समाधान” देणारा trek होता.

Thanks to Wild Rangers team & all participants ज्यांनी हा trek खरंच खूप sportingly खूप सुंदर पणे पूर्ण केला.

खरंच खरंच खूप miss केलं मी तुम्हाला, हा trek तरी मला खरंच मना पासून तुमच्या सोबत करायचा होता, Archis , भाग्या, रुपाली, तेजस, हर्षद, पंकज, प्रवीण, रुपेश, नम्रता आणि रुक्मिणी. पण आयुष्यात सगळेच नेहमी मनासारखेच होते हे पण तर शिकायचं राहिलं होतं. ते पण ह्यातून शिकायला मिळाले.

I missed you all. पण मी तुम्हाला सोडून पण खूप enjoy केलं.

इकडे अभिषेक, पूनम, गोपाल, नागपूर आणि पुण्याहून आलेल्या नवीन लोकांसोबत मस्त ओळख झाली. आणि हो पूनम.. जिने तिच्या आयुष्यातला पहिला trek without any injury आणि कुठल्याही तक्रारी शिवाय पूर्ण केला.
तिच्या इच्छा शक्तीला खरंच salute आहे. ? ? ? ?

सांगेन तितके कमी पडेल,
जेवढं बोलेन तेवढं काहीतरी सांगायचं राहिलं आहे असं वाटत राहील.
असा होता माझा “सांधन” उर्फ “समाधान” चा अनुभव…

प्रतिक ?

Edited by Archis Sujit Roshan and Namrata

Thanks guys

??☺☺

LEAVE COMMENT